शालेय पोषण आहारात आता मिळणार अंड्याचा खुराक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळांमध्ये दुपारी मध्यान्ह भोजन म्हणून शालेय पोषण आहार दिला जातो. या शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंड्यांचा खुराक मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शिजवलेले अंडे देण्यात येणार आहे. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी केळी देण्यात येणार आहेत.

शालेय पोषण आहारात यापूर्वी खिचडीभाताचा समावेश होता. अर्धपोटी आणि उपाशी राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार एक आधार ठरला आहे. विद्यार्थ्यांची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी या उद्देशाने शालेय पोषण आहारात आता अंडी मिळणार आहेत. बुधवार आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांना एक शिजवलेले अंडे देण्यात येणार आहे. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी दिली जाणार आहेत. डिसेंबर महिन्यापासून हा अंड्याचा खुराक देण्यास सुरुवात होणार आहे. अंड्यासाठी पाच रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ८०० शाळांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे.