जियो कंपनीत महाभरतीची जाहिरात करणार्‍या कोकण जॉबला युवासेनेने विचारला जाब

75

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

जियो कंपनीमध्ये महाभरती आहे़ 16 ते 22 हजार रुपये पगार मिळेल़ बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कोकण जॉबच्या कार्यालयात संपर्क साधा अशा प्रकारची जाहिरात काही दिवस रत्नागिरीत सुरु होती़ त्यामुळे आज युवासैनिकांनी कोकण जॉबच्या कार्यालयात जाऊन या महाभरतीबाबत जाब विचारला़ मात्र त्या कार्यालयातील

कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत़ जियो कंपनीच्या कार्यालयाची कोणत्या पदांसाठी भरती आहे, किंती जागांसाठी आहे़ याबाबत कार्यालयाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही़त. त्यामुळे युवासैनिकांना हे सर्व संशयास्पद वाटले युवकं युवतींनी या जाहिरातींना बळी न पडता पूर्ण चौकशी करावी असे आवाहनही युवासेनेने केले आहे.

जियो कंपनीमध्ये महाभरतीची एक जाहिरात सोशल मीडियावर फिरत आहे़ रत्नागिरीत जियो कंपनीत कामासाठी मुले मुली पाहिजेत़ पगार 16 ते 22 हजार रुपये मिळेल़ वयोमर्यादा 19 ते 35, शिक्षण बारावी उत्तीर्ण अशी जाहिरात करताना रत्नागिरी शहरातील शिवरेकर प्लाझामधील कोकण जॉबच्या कार्यालयात आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व बायोडाटा घेऊन येण्याचे आवाहन एका जाहिरातीतून करण्यात येत होते़. अनेक बेरोजगार तरुणांनी या कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती़. मात्र भरतीच्या जाहिरातीमध्ये कोणतीही स्पष्टता नसल्याने युवासैनिकांना संशय आला़ कोकण जॉबच्या कार्यालयामध्ये जाऊन युवासैनिकांनी जाब विचारला़. तालुका युवाधिकारी यांनी जियो कंपनीच्या रत्नागिरीतील संबंधित कंर्मचार्‍याकडे चौकशी केली असता त्यांनीही या भरतीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितल्यामुळे अधिकच संभ्रमावस्था निर्माण झाली़. यावेळी युवासेनेचे तालुका युवाधिकारी तुषार साळवी, उपतालुका युवाधिकारी आशू भालेकर, अनिकेत घाडी, अनिकेत चव्हाण, संजय नाईक, विभागप्रमुख महेश पत्की व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या