
मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर आरबीआयने कडक निर्बंध लादले आहेत. बँकेची सध्याची लिक्विडिटीची स्थिती लक्षात घेऊन आरबीआयने बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, आता कोणताही खातेदार आपल्या बचत खात्यातून, चालू खात्यातून जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकणार आहे. ही सहकारी बँक पुढील सहा महिन्यांपर्यंत अनेक प्रमुख कामे करू शकणार नाहीत. यामध्ये बँक कोणत्याही नवीन ग्राहकाला कर्ज किंवा उधारी मंजूर करू शकणार नाही. बँकेला आपल्या विद्यमान कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. बँक कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक करू शकणार नाही. ग्राहकांकडून नवीन ठेवी स्वीकारण्यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

























































