आता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात केले बदल

1423

सोमवारपासून एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात निधी ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे. आतापर्यत ग्राहकांना ही सुविधा केवळ ठराविक वेळेतच मिळत होती. मात्र आरबीआयने या संबधित नियमात बदल केले आहेत. त्यामुळे आता बँका त्यांच्या ग्राहकांना 16 डिसेंबरपासून 24 तास राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या सूचनेनुसार 16 डिसेंबरपासून बँक ग्राहकांना कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी एनईएफटीमार्फत एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच ऑनलाइन व्यवहाराची सुविधा आठवड्यातील सातही दिवस एनईएफटीमार्फत कधीही उपलब्ध असणार आहे.

आरबीआयने बँकेने यासाठी बँकांना आवश्यकतेनुसार पुरेशी रोकड उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले होते. तसेच आरबीआयने बँकांना निर्देश दिले आहे की, आपल्या बँकेत सुविधांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरुन ग्राहकांना निधी ट्रान्सफर करताना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नयेत.

काय आहे एनईएफटी

एनईएफटी ही ऑनलाइन व्यवहाराचा एक प्रकार आहे. याअंतर्गत ग्राहक एकावेळी दोन लाख रुपयांपर्यंत ऑनलाईन ट्रान्सफर करू शकतात. आतापर्यंत ग्राहकांना एनईएफटी व्यवहार सकाळी 8 ते सायंकाळी 6.30 दरम्यान करता येत होता. मात्र आता ग्राहकांना हा व्यवहार आठवड्याच्या सातही दिवस 24 तासात कधीही करता येऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या