‘संजू’बाबा बॉक्स ऑफिसवरही हिट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रणबीर कपूरच्या ‘संजू’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवला असून सलमान खानचा ‘रेस’ही ‘संजू’शी रेस हरला आहे. ‘संजू’बाबाची पहिल्या दिवसाची कमाई ३४ कोटी ७५ लाखांची असून तीन दिवसांतच तो शंभर कोटी क्लबमध्ये जाईल असा जाणकारांचा अंदाज आहे.

संजय दत्तचा चरित्रपट म्हणून राजकुमार हिराणीने शुक्रवारी ‘संजू’ला प्रेक्षकांसमोर आणले. रणबीर कपूरने यात साकारलेला संजय दत्त हा मूळ संजय दत्तपेक्षा भारी असल्याची प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे. कोणतीही सार्वजनिक सुट्टी नाही, सण नाही तरीही पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३४ कोटींचा गल्ला जमवला हे विशेष आहे. रणबीरचा हा सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला असून जबरदस्त ओपनिंग मिळालेला यंदाचा एकमेव चित्रपटही ‘संजू’च ठरला आहे.

बॉलीवूडच्या इतिहासात ‘संजू’ हा नॉन हॉलिडेला (सार्वजनिक सुट्टी नसलेला शुक्रवार) सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. ‘बाहुबली’ (१२२ कोटी) हा यादीतील पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे.

पहिल्या दिवसाचा ताळेबंद

  •  संजू : ३४.७५ कोटी
  •  रेस ३ : २९.१७ कोटी
  •  बागी २ : २५.१० कोटी
  •  पद्मावती : १९ कोटी
  •  वीरे दी वेडिंग : १०.७० कोटी