
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना लाल किल्ल्याजवळील अंगुरी बाग परिसरात घडली आहे. येथे रात्री 9 वाजता स्कूटीची धडक बसल्यावर दोन गटात हाणामारी झाली. स्कूटीला धडक लागल्याचा हा वाद इतका विकोप्याला गेला की, या दोन गटांमधील काही लोंकानी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या गोळीबारात 3 लोक जमखी झाल्याचं समजत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
या व्हिडीओत एका ठिकाणी काही लोकांची गर्दी जमल्याची दिसत आहे. या गर्दीत दोन गटामध्ये हाणामारी सुरू असल्याचे दिसत आहे. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस चौकीच्या 100 मीटरच्या हद्दीत घडला आहे. या घटनेचा आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपी गोळीबार करून हातात पिस्तूल घेऊन पळ काढताना दिसत आहेत.
काय आहे प्रकरण
सोमवारी रात्री मोहम्मद शाहिद हा आपल्या पत्नीसह स्कूटीने बाहेर फिरायला निघाला होता. याच दरम्यान एका दुसऱ्या वाहनाने त्याच्या स्कूटीला धडक दिली. त्यानतंर शाहिद आणि त्याच्या स्कूटीला धडक देणाऱ्या वाहनचालकामध्ये बाचाबाची झाली. शाहिदने आरोप केला आहे की, हा वाहनचालक वाहन चालवत असताना फोनवर बोलत होता, म्हणून हा अपघात घडला. शाहिदने स्कूटीला झालेल्या नुकसानीसाठी दोन हजार रुपयांची भरपाई मागितली. मात्र या इसमाने भरपाई न देता फोन करून आपल्या काही मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. तोपर्यंत घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचीही मोठी गर्दी जमली होती. याच दरम्यान शाहिदचा भाऊ ही घटनास्थळी दाखल झाला होता.
शाहिदने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी वाद इतका विकोप्याला गेला की समोरील गटातील काही लोकांनी अंधाधुंध गोळीबार केला, ज्यात शाहिद, त्याचा भाऊ आणि दोन इतर लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओच्या माध्यमातून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
#JUSTIN: Three men were shot during an incident of road rage near Red Fort in North Delhi late on Monday night, the police said. The incident occurred after a motorcyclist brushed past the two-wheeler of a 30-year-old businessman, causing minor damage. @IndianExpress,@ieDelhi pic.twitter.com/pL6Ax3Q35r
— Mahender Singh Manral (@mahendermanral) February 1, 2022




























































