
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कश्मीर खोऱयातील दहशतवादामुळे देशाच्या अन्य भागांत स्थलांतरित झालेल्या कश्मिरी पंडितांना पुन्हा कश्मीर खोऱयात आणण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सुरू केले आहेत. त्यांच्या या ‘घरवापसी’ची सुरुवात येथील माता खीर भवानी देवीच्या यात्रेच्या मुहूर्तावर होणार आहे. २० जून रोजी होणाऱया या यात्रेनिमित्त देवीचा खास दर्शन सोहळा कश्मिरी पंडितांसाठी राज्य सरकारतर्फे आयोजित केला आहे.
यात्रेचा खर्च सरकार करणार
कश्मिरी पंडितांची घरवापसी व्हावी यासाठी यात्रेची तयारी ही दिल्ली, जम्मूमध्ये सुरू आहे. या यात्रेचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. १९९० मध्ये कश्मीर खोऱयात दहशतवादाने उग्र स्वरूप धारण केले. तेव्हा कश्मिरी पंडितांना आपली घरे सोडून देशात अन्य ठिकाणी पलायन करावे लागले तेव्हापासून अस्थिर असलेले कश्मीरचे वातावरण अजूनही अस्थिरच आहे.

























































