
सामना ऑनलाईन । दिल्ली
हिंदुस्थानी खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत चुकीची आणि द्वेषपूर्ण माहिती पसरवणारा मजकूर आणि व्हिडीओ हटवा, अशी नोटीस केंद्र सरकारने फेसबुक आणि गुगलला बजावली आहे. चुकीच्या मजकुरामुळे खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत गैरसमज पसरत आहेत, ग्राहक दर्जेदार खाद्यपदार्थांना नकार देत आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
हिंदुस्थानात मिळत असलेल्या गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत अनेकदा चुकीच्या मजकुरासह फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत. चुकीची माहिती आणि बोगस व्हिडीओंमुळे सुरक्षित आणि दर्जेदार पदार्थांबाबत ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. यामुळे संबंधित हॉटेल्स आणि संस्थांना याचा आर्थिक फटका बसतोय, असे दिसून आले आहे.
याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल आणि फेसबुकला नोटीस बजावली आहे. तत्काळ हा बोगस मजकूर हटवा आणि चुकीचे व्हिडीओ अपलोड करणाऱयांचे अकाऊंट ब्लॉक करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे सीईओ पवन अग्रवाल यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश सहानी यांच्याकडे तक्रार केली होती.
प्लॅस्टिकची अंडी, प्लॅस्टिक राईस आणि दूध भेसळीची चुकीची माहिती पसरवली जात आहे.
दुधात घातक ‘मेलामाइन’ची भेसळ करण्यात येत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये दूध भेसळीस अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने परकानगी दिली असल्याचे या व्हिडीओत दाखकण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बजाकलेल्या नोटिशीमध्ये या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. यामुळे अशा प्रकारचा कुठलाही मजकूर, फोटो आणि व्हिडीओ गुगल आणि फेसबुकने तत्काळ हटकाका आणि रोखावा, अशी सूचना मंत्रालयाने केली आहे.
हॉटेल उद्योगाला फटका
खाद्यपदार्थांबाबत पसरवलेल्या गैरसमजामुळे अनेक ग्राहक दर्जेदार आणि सुरक्षित पदार्थांनाही नकार देत आहेत. यामुळे देशातील अन्न सुरक्षा यंत्रणा आणि खाद्यपदार्थांबाबत जागतिक पातळीवर अविश्वास निर्माण होतोय. तसंच हॉटेल क्षेत्रातील अनेक संस्थांना जबर आर्थिक फटका बसतोय. शिवाय नागरिकांच्या आरोग्यावर, समाजावर आणि व्यापारावर विपरित परिणाम होतोय, असं सीईओ पवन अग्रवाल यांनी सांगितलं.
























































