
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सांगितले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सत्येंद्र जैन यांच्यानंतर अटक होणारे दिल्लीचे पुढील मंत्री असतील. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की, आम्हा सर्वांना एकत्र तुरुंगात टाका,’ असे त्यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकार मनीष सिसोदिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्याच्या तयारीत असल्याचे ‘विश्वसनीय सूत्रांकडून’ समजले आहे.
‘विश्वसनीय सूत्रांनी मला कळवले आहे की मनीष सिसोदिया यांना लवकरच अटक केली जाणार आहे; केंद्राने सर्व एजन्सींना त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘आम्हा सर्वांना एकाच वेळी अटक करा, आमची चौकशी करा, छापे टाका. मग आम्ही कामावर परतू’, असा टोलाही त्यांनी लगावला.
केजरीवाल यांनी सोमवारी अटक करण्यात आलेल्या सत्येंद्र जैन यांच्यासाठी जानेवारीमध्ये अशीच ‘भविष्यवाणी’ केली होती.
पहले भी कई Raid कराए, कुछ नहीं मिला। Court ने जांच Agencies को डांटा।
हम मज़ाक में कहते हैं- हम Modi जी से ईमानदारी का Certificate लेकर आए हैं।
हम सबको एक साथ गिरफ़्तार कर लीजिए, हम फिर आप से देश की सबसे ईमानदार और देशभक्त पार्टी का Certificate लेकर जाएंगे।
-CM @ArvindKejriwal pic.twitter.com/QnUIjirrEq
— AAP (@AamAadmiParty) June 2, 2022
‘मला मनीष सिसोदिया यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा फायदा होत असलेल्या 18 लाख मुलांना विचारायचे आहे. मनीष सिसोदिया भ्रष्ट आहेत का? त्यांनी जगासमोर देशाचा गौरव केला, अशा माणसाला अटक करायची की गौरव करायचा?’, असा सवाल त्यांनी केला.
AAP ने देखील “पुरावा !!!” म्हणत ट्विट केले आहे. फुगलेल्या खर्चात शाळांच्या इमारतीत ₹ 2,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे पत्र शेअर करण्यात आले आहे.
PROOF‼️
After @SatyendarJain, BJP is now planning to arrest Delhi’s Education Minister @msisodia in a FAKE Case.
PM Modi, why don’t you arrest all AAP leaders at once & finish all your investigations so that we can focus on working for the people? pic.twitter.com/oaiy2GXS9L
— AAP (@AamAadmiParty) June 2, 2022
जैन आणि सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्यामागे काय राजकारण आहे हे माहित नाही नसल्याचेही केजरीवाल म्हणाले.
‘सत्येंद्र जैन यांनी मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यास आणि लोकांना लस मिळवून देण्यात मदत केली… पण आता ते त्यांना भ्रष्ट म्हणत आहेत. मला विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विचारायचे आहे – मनीष जी आणि सत्येंद्र जी भ्रष्ट असू शकतात का? जर ते भ्रष्ट असतील तर कोण आहे प्रामाणिक?’, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
केजरीवाल म्हणाले की, दोन मंत्र्यांना फसवण्याचा आणि त्यांचे नाव कलंकित करण्याचा प्रयत्न झाला पण “मी ते होऊ देणार नाही.”
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ‘आप’च्या 20 हून अधिक आमदारांविरुद्धच्या खटल्यांचा संदर्भ दिला आणि ‘जेल-जेल गेम’ पुन्हा सुरू झाल्याचे सांगितले.
‘आम्ही तपासात अडकत राहिलो, तर आम्ही कसे आणि केव्हा काम करणार? आम्हाला तुरुंगाची भीती वाटत नाही. मला खात्री आहे की यावेळीही दिल्लीची जनता आमच्या पाठीशी असेल आणि आम्हाला सर्वात प्रामाणिक असल्याचा दाखला देतील की, हे देशातील भ्रष्टाचारमुक्त आणि देशभक्त सरकार आहे’, असा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.
सत्येंद्र जैन हे अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात आहेत, जे त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत आहेत.



























































