
‘निवृत्त अधिकाऱयाला जे नियमित पद आहे त्याच्यावर नियुक्त करता येत नाही. मात्र राजभवनातून तसे आदेश देण्यात झाले आहेत. निवृत्त अधिकाऱयाला त्या पदावर नियुक्त करणे हे अनियमित कामकाज आहे. हा नियमांचा भंग आहे. राजभवनातून नियमांचा भंग होणे हे अपेक्षित नाही. राज्यपाल सर्वच विषयांवर कायदेशीर सल्ला घेत असतात. तेव्हा निवृत्त अधिकारी खासगी सचिव नेमणूक याविषयावरसुद्धा कायदेशीर सल्ला घेतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज लगावला आहे.
राज्यपालांनी आपल्या खासगी सचिवपदी निवृत्त अधिकारी उल्हास मुणगेकर यांची नियुक्ती केली आहे. याबाबत नवाब मलिक यांना विचारले असता ते म्हणाले, हजारोंच्या संख्येने सनदी अधिकारी या राज्यात काम करतात. त्यातील एखादा अधिकारी निवडण्याचा अधिकार राजभवनाला आहे. निवृत्त व्यक्तीला नियमित पदासाठी नियुक्त करता येत नाही. या नियुक्तीसाठी राजभवनातूनच आदेश निर्गमित झाले आहेत. राजभवनामधून नियमांचा भंग होणे अपेक्षित नाही. एका निवृत्त अधिकाऱयाची पुन्हा नियुक्ती करण्याचा मोह कशासाठी, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
























































