शुबमन हिंदुस्थानचा भावी कर्णधार; रॉबिन उथप्पा गिलच्या नेतृत्वावर प्रभावित

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱया शुबमन गिलच्या फलंदाजीच्या प्रेमात तर अवघं जग पडलंय. अनेक तरुणींच्या तर तो गळय़ातला ताईतही बनलाय. याच यादीत हिंदुस्थानच्या माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचंही नाव जोडलं गेलंय. तो गिलच्या फलंदाजीनेच नव्हे तर नेतृत्वानेही प्रभावित झाला असून त्याच्या मते तोच हिंदुस्थानी संघाचा भावी कर्णधार आहे. शुबमन गिलचा जबरदस्त फॉर्म आयपीएलमध्येही सुरूच आहे. रविवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात गिलने 35 धावांची शानदार खेळी केली. या मोसमात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने जिंकले आहेत.