
रुपयाचे अवमुल्यन अद्यापही सुरुच असून आज (मंगळवार) पुन्हा एकदा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य आजवरच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरले आहे. परदेशातील बाजारातील मजबूत डॉलर आणि देशांतर्गत शेअर बाजारातील तोटा यामुळे मंगळवारी रुपया 7 पैशांनी घसरून 80.05 (तात्पुरत्या) या विक्रमी निचांकी पातळीवर बंद झाला.
देशांतर्गत स्टॉक मार्केटमधून सतत विदेशी कंपन्यांचे बाहेर पडत आहेत तसेच अमधूनमधून डॉलरच्या विक्रीचे प्रमाण वाढल्याने त्याचा परिणाम रुपयाच्या अवमुल्यनावर झाला आहे. यापार्श्वभूमीवर इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये मंगळवारी रुपया 7 पैसे निचांकी पातळीवर खुला झाला. रुपया डॉलरच्या तुलनेत 80.05 रुपयांपर्यंत घसरला आहे.
Rupee falls 7 paise to all-time low of 80.05 against US dollar in early trade
— Press Trust of India (@PTI_News) July 19, 2022
डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने याचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसतोय. कुठल्याही देशाच्या चलनाचे मूल्य घसरल्यास संबंधित देशात महागाई वाढते. परदेशातून वस्तुंची आयात करणे अधिक खर्चिक बनल्याने वस्तुंचे दर वाढतात. निर्यातदारांना मात्र ही कमाईची चांगली संधी असते. कारण निर्यातदारांना डॉलरमध्ये पैसे मिळतात.
सेन्सेक्समध्ये घसरण
मंगळवारी सुरुवातीच्या सत्रामध्ये सेन्सेक्स 117.3 अंकांनी घसरून 54 हजार 403.85 हजारांवर पोहोचला. तर निफ्टीमध्येही 28.80 अंकांची घसरण झाली आणि तो 16 हजार 249.70 वर पोहोचला.
Sensex declines 117.3 points to 54,403.85 in early trade; Nifty falls 28.80 points to 16,249.70
— Press Trust of India (@PTI_News) July 19, 2022




























































