Video सचिनच्या मूर्तिमंत रूपाचा सोहळा, वानखेडे स्टेडियमवरील 22 फुटी पुतळ्याचे दिमाखात उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मूर्तिमंत रूपाचा दिमाखदार सोहळा वानखेडे स्टेडियमवर आज पार पडला. सचिनच्या 22 फुटी पूर्णाकृती ब्राँझच्या अनोख्या शिल्पाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. मुंबई क्रिकेट संघटनेने सचिनला त्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ही अनोखी भेट देताना ब्राँझरूपी पुतळ्याची घोषणा केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

या सोहळ्याला स्वत: भारतरत्न सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एमसीए अध्यक्ष अमोल काळे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे , , बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार उपस्थित होते.

22 फुटी पुतळा

या शिल्पाची एकूण उंची 22 फूट असून सचिनच्या मुख्य मूर्तीची उंची 10 फूट आहे. या मूर्तीखाली क्रिकेटचा चेंडू असेल. जगाचे चिन्ह म्हणून त्याची निर्मिती केलीय. त्यावर रमेश तेंडुलकर यांचे नाव कोरलेले आहे. विशेष म्हणजे, या चेंडूच्या पॅनलवर सचिनने केलेल्या विक्रमांना नोंदविण्यात आले आहे. या पुतळ्यासाठी क्ले जपानवरून मागविला होता. हा पुतळा वानखेडेवरील सचिन तेंडुलकर स्टँडच्या शेजारी असलेल्या विजय मर्चंट स्टँडमध्ये उभारण्यात आला आहे.