महानायक अमिताभ बच्चन यांना सचिन तेंडुलकरने दिल्या हटके शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. ते 81 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्ताने जगभरातील चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा येत आहेत. यामध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने बिग बींना दिलेल्या शुभेच्छा लक्षवेधक ठरल्या आहे.

सचिन तेंडूलकरने बुधवारी बॉलीवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांना त्यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त खास पद्धतीने सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने केबीसी अंदाजात दिलेल्या शुभेच्छा पाहून चाहतेही खूश झाले आहेत. सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहीलेय, इतकी वर्ष सर्वांना प्रश्न विचारलेत, आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अमित जी. मास्टर ब्लास्टरच्या या ट्विटला लाखो लोकांनी व्ह्यूज केले असून 18 हजार लाईक्स मिळाले आहे. शेकडो कॉमेण्टस मिळाल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्वतःचा फोटो पोस्ट करताना सचिन तेंडुलकरने ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन कोण असा प्रश्न विचारला आहे.  A. सुपरस्टार, B. आयकॉन, C. लीजेंड, D. हे सर्व. ..तर या प्रश्नाचे उत्तर लगेच कमेंट मध्ये कळवा.  असे पर्याय दिले आहेत. अनेकांनी डी असे उत्तर दिले आहे. तर अनेकांनी अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.