साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नवनाथ गोरेंवर मोलमजुरी करण्याची वेळ

कोरोना महामारीमुळे जगण्याचे संदर्भ बदलून गेलेत. अनेक उद्योगधंदे बदलले, तर अनेक डबघाईला आहे आहेत. लाखोजणांवर बेराजगाराची कुऱहाड कोसळली. कोरोनाच्या मृत्यूमुळे जेवढी कुटुंबे उद्धवस्त झाली, त्यापेक्षा अधिक कुटुंबे बेरोजगारीमुळे उद्धवस्त झाली. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या युवा साहित्यकारावरही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. ‘फेसाटी’ कार नवनाथ गोरे यांची करुण कहाणी अनेकांना सुन्न करणारी आहे. तर कोरोनामुळे आयुष्याची दुप्पट फेसाटी झाल्याची उदगीन भावना नवनाथ व्यक्त करत आहेत.

सांगली जिह्यातील जत तालुक्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेनजिक असणाऱया निगडी ब्रुद्रुक या छोटय़ाशा गावांतून आलेल्या तरूणाला साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे नवनाथ गोरे यांचे नाव संपूर्ण राज्यात चमकले. पण पोटाचा प्रश्न मात्र सुटला नाही. पदव्युत्तर असणाऱया नवनाथने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी नोकऱयाही केल्या. पण कायमस्वरूपी पोटाचा प्रश्न मिटेल अशी नोकरी त्याना मिळाली नाही.

फेसाटीमुळे नवनाथ गोरे साहित्यिक म्हणून समाजासमोर आला. फेसाटीला 1018 साली साहित्य अकामदमीचा युवा साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला. यानंतर फेसाटीला अनेक पुरस्कार मिळाले. छोटय़ाशा पत्र्याच्या खोलीत घरातील सामानाच्या बोचक्यांपेक्षा पुरस्कारांच्या शिल्डची गर्दी झाली. वर्तमानपत्र आणि मासिकातून फेसाटीचे कौतुक झाले, पण नवनाथ यांचे आयुष्य मात्र, बदलले नाही.

नगर जिल्ह्यातील एका महाकिद्यालयात तासिका बेसकर ते काम करत होते. परंतु कॉलेज सध्या बंद आहे त्यामुळे उत्पन>ाचे दुसरे साधन नसल्याने त्यांनी गाकीच शेतीकर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्काह चालकिण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पोटाच्या आगीमुळे प्रतिभा वाहून गेली

कोरोनाच्या संकटामुळे कामही मिळणे अवघड झाले. उसनवारीवर खायला धान्य मिळेना यातच दोन दोन दिवस पाण्यावर काढायची वेळ येऊ लागली. पोटाच्या आगीपुढे अंगातील प्रतिभा वाहून गेली. या सहा महिन्यात आज कुटुंबाला काय घाऊ घालायचे या विवंचनेत असणाऱया नवनाथने गेल्या सहा महिन्यात पेन हातात धरून एक ओळ लिहिली नाही किंवा कोणत्या पुस्तकाचे पानही उघडून बघितले नाही. जगण्याच्या विवंचनेत या कोरोनामुळे आयुष्याची दुप्पट फेसाटी झाल्याचे उद्विग्नपणे नवनाथ सांगतो.

मोठ्या अपेक्षेने शिकलो पण अद्याप माझी उपेक्षाच संपलेली नाही. वडिलांचे निधन झाले म्हणून नगरहुन गावी आलो, आणि लागलीच लॉकडाऊन सुरू झाले. गांवीच अडकून पडलो. त्यामुळे मिळेल ते काम करून दोन वेळच्या पोटाची भूक भागवण्यासाठी धडपडतो आहे. माझ्यासमोर मजूरीशिवाय पर्याय नाही. आई आणि एक अपंग भाऊ असं आमचं तिघांचं कुटुंब आहे. काहीही करून त्यांना जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. दिवसाला दोनशे रुपये मजुरी मिळते तर कधी तीनशे रुपये मिळतात. यावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आज ना उद्या मला चांगली नोकरी मिळेल अशी आशा ठेवून येईल तो दिवस ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. – नवनाथ गोरे

आपली प्रतिक्रिया द्या