
अभिनेता सैफ अली खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण, त्याचा बंटी और बबली 2 बॉक्स ऑफिसवर येणार आहे. जवळपास दोन वर्षांनी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट झळकणार आहेत. त्यामुळे सैफ सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी अशी जोडी झळकणार आहे. त्यांच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी हे दोन चेहरे झळकणार आहेत. चित्रपटाची कथा बंटी आणि बबलीच्या दोन जोड्यांभोवती फिरणार आहे. यशराज फिल्मच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. वरुण वी. शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.
याच चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी हे चारही कलाकार कपिल शर्माच्या शोमध्ये हजर झाले होते. तिथे विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर उत्तरं देताना सैफने सगळ्यांची हसून पुरेवाट केली. वास्तविक या वर्षात तो तांडव, भूत पुलिस आणि बंटी और बबली 2 अशा तीन चित्रपटांसाठी कपिल शर्माच्या शोवर दाखल झाला होता.
त्याबाबत कपिलने सैफला प्रश्न देखील विचारला. या तीन चित्रपटांसाठी तुम्ही प्रमोशन केलं आहे. आता तुम्हाला कामात मग्न राहणं आवडतं की आता कुटुंबात माणसं वाढल्याने असं करत आहात, असा प्रश्न कपिलने सैफला विचारला. त्यावर सैफ म्हणाला की, मला कुटुंबाच्या आर्थिक बाबींविषयी काहीही वाटत नाही. पण, आता घरी राहिलो तर अजून मुलं होतील, असं सैफ म्हणाला. सैफच्या या उत्तरावर सगळे हसायला लागले. बंटी और बबली 2 येत्या 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

























































