खर्डा लढाईत धारातीर्थी पडलेल्या शूरवीरांना शिवप्रतिष्ठानची मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड तालुक्यातील खर्डा (शिवपट्टणम) येथे ११ मार्च १६७५ मध्ये मराठे व निजामाची लढाई झाली होती. यात मराठ्यांनी विजय मिळवून स्वराज्याचा भगवा ध्वज अखंड तेवत ठेवला होता. या लढाईत धारातीर्थी पडलेल्या शूरवीरांना शिवप्रतिष्ठानच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी मेजर जवळेकर यांनी इतिहासाबद्दल सविस्तर माहिती सांगितली.

नायगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी तसेच जामखेड येथील क्रांती मैदानी पथकातील धारकऱ्यांनी लाठी काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, भालाफेक या युद्धकलेचे प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी या घोषणेने परीसर दुमदुमून गेला. किल्ल्यावर ऐतिहासिक क्षणांची चित्रे, माहिती फलक व तोफा बसवून किल्ल्याचे वातावरण शिवमय करावे, अशी मागणी पांडुरंग भोसले यांनी यावेळी केली.

छत्रपती संभाजी महाराज बलिदन मासानिमित्त प्रत्येकाने आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थाचा एक त्याग करण्याची शपथ शिवभक्तांनी घेतली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले, महेश भोसले, संतोष शिंदे, माऊली जमदाडे, नाना खंडागळे, भाऊ पोटफोडे, बंटी पाटील, निलेश जाधव, श्रीकांत शिकेतोड, निलेश देवकर यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.