संजय देशमाने यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संजय बबनराव देशमाने (43) यांचे आज 26 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान सायंकाळी 5 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दैनिक सामनाच्या बुलढाणा कार्यालयात ते जाहिरात प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. संजय देशमाने यांचे सोमवार 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता ब्रेन हॅमरेज झाले. त्यानंतर तत्काळ त्यांना येथील मेहेत्रे हॉस्पिटल येथे दाखल केले. डॉक्टरांनी एमआरआय तपासणी करुन ब्रेन हॅमरेजमुळे प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले व त्यांना तत्काळ संभाजीनगर येथे हलवावे असा सल्ला दिला.

संभाजीनगर येथील अ‍ॅपेक्स हॉस्पिटल येथे त्यांना सायंकाळी दाखल केले. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान दुपारी 5 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांचे मुळगावी रायपूर येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुले असा बराच मोठा परिवार आहे.