
आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासमोरील संकटं काही कमी होताना दिसत नाहीत. या चित्रपटाला सतत विरोध होत आहे. या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीसाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व अभिनेत्री आलिया भट्ट यांनी मुंबईच्या मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटने हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. या प्रकरणी 21 मे रोजी सुनावणी होणार आहे.
हा खटला क्रिमिनल मानहानीचा असून गंगूबाई काठियावाडीच्या मुलाने दाखल केलेला आहे. बाबू रावजी शाह असे त्या व्यक्तीचे नाव असून तो स्वत:ला गंगूबाईचा दत्तक मुलगा असल्याचे सांगतो. ‘या चित्रपटामुळे आपली व आपल्या परिवाराची बदनामी होत आहे. हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे त्य़ा पुस्तकात खोटे दावे केलेले आहेत. त्यामुळे हा चित्रपट खोट्या गोष्टी दाखवतो.
याआधीही बाबू याने न्यायालयात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करत त्याचा ट्रेलर व प्रोमोवर बंदी आणण्याची मागणी केलेली. मात्र त्याची ती याचिका फेटाळण्यात आलेली. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शाह यांच्या कुटुंबींयांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यांचा हा दावा लक्षात घेत न्यायालयाने त्यांची चित्रपटाविरोधी य़ाचिका दाखल करुन घेतली.




























































