
कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. जतमधील 40 गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याच ठराव केला आहे. त्यामुळे या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. त्यावर शिवसेना पक्षाचे नेते संजय पवार यांनी कर्नाटकला इशारा दिला आहे.
कर्नाटक मुख्यमंत्र्यांना हे स्वप्न पडले असेल, आम्ही एक इंचही जागा देऊ देणार नाही. आमच रक्त सांडले तरी चालेल, असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे. महाराष्ट्राने संयुक्त महाराष्ट्र ठेवण्यासाठी रक्त सांडले आहे. आमचीच गाव पहिल्यांदा द्या. या सगळ्यात भाजप मुख्य आहे, भाजप या गोष्टी करवून घेत आहे, अशी टीकाही संजय पवार यांनी केली.
हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आम्ही कर्नाटकला सडेतोड उत्तर देऊ. कर्नाटकचा आगाऊपणा असाच सुरू राहिला तर शिवसेना धडा शिकवेल, असा सणसणीत इशारा पवार यांनी कर्नाटक सरकारला यावेळी दिला.

























































