भुसावळ येथील स्टेट बँकेच्या सात कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण,  बँक व्यवहार ठप्प  

477
sbi-poster

शहरातील मुख्य शाखा असलेल्या स्टेट बँकेत सोमवारी सात कर्मचारी सशंयित कोरोना बाधित आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे .खबरदारी घेण्यासाठी आज सकाळ पासुन बँकेचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

याबाबतची सविस्तर माहिती देण्यास शाखा व्यवस्थापकांनी नकार दिला आहे. बँकेत येणाऱ्या खातेदारांना व्यवहाराविना परतावे लागले. यामुळे ग्राहकांचे हाल झाले. कोरोना बाधित संशयित कर्मचार्‍यांना तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन त्यांचा अहवाल आल्यानंतरच सर्व स्पष्ट होणार आहे. तसेच बँकेचे व्यवहार कधी सुरू होतील हे मात्र समजु शकले नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या