
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 18 डिसेंबरला शिष्यवृत्ती योजना परीक्षा होणार आहे. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी आहे अशा आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in पिंवा http://nmmsmsce.in या वेबसाईटवर शाळांना परीक्षा अर्ज उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी नियमित परीक्षा शुल्कासह 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतो. तर अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.

























































