सुरक्षारक्षक ते आयआयएमचा प्राध्यापक, थिरुवनंतपुरममधील रणजीतचा प्रेरणादायी प्रवास

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाही. हीच म्हण खरी ठरवलीय थिरूवनंतपुरममधील रणजीत रामचंद्रन या 28 वर्षीय तरुणाने. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने सुरक्षारक्षक ते रांचीच्या आयआयएमचा सहाय्यक प्राध्यापक असा पल्ला गाठला आहे. त्याचा हा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

रणजीत हा केरळमधील कसारगोडचा रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे तर आई रोजगार हमीवर मजुरीचे काम करते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वडिलांच्या मदतीसाठी रणजितने सुरक्षारक्षक म्हणून चार हजार पगारांवर नोकरी केली. दिवसा कॉलेज आणि रात्री नोकरी असा त्याचा दिनक्रम असायचा. काम करतानाही त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.

जिद्दीने त्याने अर्थशास्त्र विषयात पीएचडी पूर्ण केली. गेल्याच आठवडय़ात त्याला आयआयएम रांचीचे नियुक्ती पत्र मिळाले आहे. त्यानंतर रणजीतने सोशल मीडियावर आपल्या झोपडीचे फोटो शेअर केले. त्याने लिहिलंय की, आयआयएमचा असिस्टंट प्रोफेसर याच घरात जन्मला आहे. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणाऱया तरुणांना कदाचित माझ्यामुळे प्रेरणा मिळेल. आयआयएममध्ये संधी मिळण्यार्प्वी तो बंगळुरू येथील एका विद्यापीठात कार्यरत होता.

आपली प्रतिक्रिया द्या