चंदिगड ते चेन्नई…ज्येष्ठांची रोड ट्रीप; 10 दिवसांत 4500 किमीचा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे सारेच मानसिकदृष्टय़ा त्रस्त झाले आहेत. लोकांना बदल हवाय… त्यांना काहीतरी नवीन करायचंय. या विचारातूनच तीन ज्येष्ठ नागरिकांनी एका मोठय़ा रोड ट्रीपचे आयोजन केले. रॉबिन नकाई (68), अमृता नकाई (65), उषा हुड्डा (65) अशी या तिघांची नावे आहेत. तिघांनी 10 दिवसांत 4500 किलोमीटरचा प्रवास केला.

तिघांनी चंदिगड येथून प्रवासाला सुरुवात केली. गाडी चालवत   उदयपूर, मुंबई, पणजी, हंपी, बंगळुरू, चेन्नई या ठिकाणी ते फिरले. त्यानंतर तिथून पुढे अंदमानला रवाना झाले. तिघेही कॉलेजपासूनचे मित्र आहेत. रॉबिन नकाई सांगतात, कॉलेजात असताना आम्ही खूप अतरंगी वागायचो आणि त्याबद्दल एकमेकांची पाठदेखील थोपटायचो.  जी माणसं तुम्हाला चांगलं समजून घेतात, त्यांच्यासोबत प्रवासाचा आनंद घ्यायचा.

रॉबिन, अमृता आणि उषा यांनी घाईघाईने प्रवास करण्यापेक्षा लांबचा प्रवास थांबत करायचा निर्णय घेतला होता. ड्रायव्हिंग करत मुंबईतून गोव्याला पोहचायला साधारण 12 तास लागतात. मात्र तिघांना चार दिवस लागले. वाटेत नांदगाव-अलिबाग येथे थांबून महाराष्ट्रातील किल्ले, गणपतीपुळे, तसेच गुहागर- रत्नागिरीची सफर त्यांनी केली.