ज्येष्ठ पत्रकार सुभाष महाजन केंद्रीय ग्राहक दक्षता पथकाच्या राज्य उपाध्यक्षपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ पत्रकार व शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुभाष महाजन यांची केंद्रीय ग्राहक दक्षता पथकाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कर्जवकर यांनी ही नियुक्ती केली असून महाजन यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. ग्राहक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल ही निवड झाली आहे.

सुभाष महाजन हे गेल्या अनेक वर्षापासून कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शिक्षण, कामगार, पत्रकारिता आदि विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. राज्य शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समिती यांच्यावतीने राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक गौरव पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतील आजीव सदस्यपद सुभाष महाजन यांना प्रदान करण्यात आले आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पत्रभूषण पुरस्कारदेखील त्यांना मिळाला. केंद्रीय ग्राहक दक्षता पथकावर नियुक्ती झाल्याने हे काम आता अधिक सक्षमपणे करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.