
सामना ऑनलाईन । जम्मू
हिंजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणी याच्या तिसऱ्या वर्षश्राद्धाच्या निमित्तान फुटिरतावाद्यांनी कश्मीरमधील चार जिल्ह्यात सोमवारी बंदचे आवाहन केले आहे. फुटिरतावाद्यांच्या या आवाहनानंतर कश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.
जॉईंट रिसस्टंस लिडरशिप या फुटिरतावाद्यांच्या संघटनेचे नेते सय्यद अली गिलानी, मिरवाईज उमर फारुक आणि मुहम्मद यासिन मलिक यांनी लोकांना बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कश्मीर खोऱ्यात बुरहान वाणीला शहीद ठरविणारे पोस्टर्स देखील लावण्यात आले आहेत.
‘कश्मीर खोऱ्यात सोमवारी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार घडू नये शांतता रहावी यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच खोऱ्यातील कायदा व व्यवस्था रहावी यासाठी जे काही गरजेचे असेल ते केले जाईल, असे लष्कराकडून सांगण्यात आले.
























































