धक्कादायक! टीम इंडियाच्या स्टार खेळाडूच्या पत्नीसोबत रेल्वेत गैरवर्तन, टीटीईवर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां पुन्हा एकदा चर्चेत आहे. हसीनने रेल्वेमध्ये तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. बिहारच्या कटिहार येथून कोलकाताकडे येत असताना हा प्रकार घडल्याचे हसीनने म्हटले आहे. याबाबत सर्व घटनाक्रम तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून सांगितला आहे.

हसीन जहां हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, मी एका नातेवाईकच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी बिहारच्या कटिहार येथे गेली होती. तिथे विमानाची सुविधा नव्हती. लग्न आटोपल्यानंतर बिहारहून कोलकाताला जोगबनी एक्सप्रेसने येत होते. मला वरचा 6 नंबरचा बर्थ देण्यात देण्यात आला होता. परंतु खाली 7 नंबरची सीटही खाली होती. एका प्रवाशाच्या विनंतीवरून मी खालच्या बर्थवर बसण्याचा निर्णय घेतला.

मालदा रेल्वे स्थानक आल्यानंतर टीटीई (तिकीट तपासणीस) एका व्यक्तीसोबत आला आणि चुकीच्या पद्धतीने चौकशी करू लागला. मला माझ्या जागेवरून उठवण्यात आले. माझा मोबाईलही फेकून दिला. याबाबत मी रेल्वे हेल्पलाईनमध्ये तक्रार दाखल केली. फरक्का रेल्वेस्थानक आल्यानंतर पोलिसांचे एक पथक आणि माझी तक्रार ऐकून घेतल्यानंतर संपूर्ण सुरक्षेसह मी कोलकाताला पोहोचली. रेल्वे पोलिसांना धन्यवाद, परंतु या गैरवर्तनामुळे मला धक्का बसला आहे, असे हसीन जहांने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

hasin

दरम्यान, रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एकलव्य चक्रवर्ती यांनी याबाबत रेल्वेकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले. मात्र याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.