शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे.

शरद पवार यांना 7 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर 15 दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

याआधी मार्च महिन्याच्या अखेरीस शरद पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या