गडचिरोलीत शरद पवारांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोलीत शरद पवारांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने संवादातून मार्ग काढावा अशीही सूचना त्यांनी केली. प्रसंगी आम्ही मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विलिनीकरण अशक्य असल्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. एसटी कर्मचारी संघटनांनी आडमुठेपणाचा मार्ग सोडावा असे आवाहन करत सरकारशी चर्चा करताना मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा करता येते मात्र जमावाशी नाही हे त्यांनी लक्षात आणून दिले.