
सगळ्या भाषणांमध्ये मी 83 वर्षांचा झालो, 84 वर्षांचा झालो, असे सातत्याने सांगितले जाते. मी काही म्हातारा झालेलो नाही. लय भारी लोकांना सरळ करण्याची ताकद माझ्यात अजूनही आहे. तुम्ही काही चिंता करू नका, असा इशारा ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना दिला आहे.
मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्यावतीने केळगाव-चऱहोली खुर्द येथे ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या बैलगाडा शर्यतीच्या अंतिम लढती पाहण्यासाठी रविवारी शरद पवार यांनी हजेरी लावली. या वेळी शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, माझी एक तक्रार आहे. सगळ्या भाषणांमध्ये मी 83 वर्षांचा झालो, 84 वर्षांचा झालो, म्हातारा झालो असे म्हणतात. मात्र अद्याप मी म्हातारा झालेलो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. जे काही तुमचं दुखणं आहे ते लवकरच दूर करू. यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व आपण मिळून करू. लवकरच नवा इतिहास घडवू, अशा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले, आज आपण वेगळ्या संकटातून जात आहोत. एका बाजूने शेतकऱयाला निसर्गाशी लढा देत आपली शेती सांभाळावी लागत आहे. पण दुसरीकडे ज्याच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना बळीराजाबद्दल प्रेम नाही. जिह्यात खेड तालुक्यात सर्वात जास्त कांदा पिकतो. मात्र कष्टाने पिकवलेल्या या कांद्याला चांगली पिंमत देण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. उलट विविध कर बसवले, निर्यात बंदी केली. ज्यांना खऱया अर्थाने मदत केली पाहिजे, ती मदत करायची सोडून त्यांच्यासमोर संकटे वाढवली जात आहेत. साखर कारखानदारी महाराष्ट्राची महत्त्वाची कारखानदारी आहे. साखर निर्यात करण्यासंदर्भात आपण वेळेवेळी काळजी घेतली. मात्र या सरकारने त्यावर बंदी आणली. या ना त्या निमित्ताने बळीराजा संकटात कसा जाईल, हे पाहणारे आजचे राज्यकर्ते आहेत. त्यामुळे आपल्याला एकजुटीची शक्ती उभी करावी लागेल.
शेतकऱयांबाबत सरकारमध्ये आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱयांवर संकट ओढण्याचे काम होत आहे. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना बळीराजाबद्दल प्रेम नाही, ज्यांना खऱया अर्थाने मदत केली पाहिजे आहे, ती मदत करायची सोडून त्यांच्यासमोर संकटे वाढवली जात आहेत.
महाराष्ट्राचे चित्र बदलणारच
कांदा प्रश्न असेल, साखर निर्यात बंदी असेल, या ना त्या निमित्ताने बळीराजा संकटात कसा जाईल, हे पाहणारे आजचे राज्यकर्ते आहेत. नाकर्त्या सरकारच्या विरोधात एकजुटीची शक्ती उभी करून महाराष्ट्राचे चित्र बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही पवार यांनी व्यक्त केला.
























































