
चार राज्यांतील निवडणुकीचा जो काही निकाल लागला, त्यापेक्षा वेगळा निकाल लागेल अशी माहिती आमच्याकडे नव्हती. मात्र, महाराष्ट्रात 2024मध्ये भाजप युतीची सत्ता येणार नाही, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केला. चार राज्यांतील निवडणूक निकालाचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
शरद पवार आज सातारा दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजस्थानमध्ये काँग्रेस पाच वर्षे सत्तेत होती. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानच्या जनतेचा दिसतो. मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता होती. तिथे त्यांनी अधिक लक्ष पेंद्रित केले होते. तेलंगणात सत्ताधाऱयांना साजेसाच मूड असतो, असे नेहमी दिसते. पण राहुल गांधी यांची हैदराबादमध्ये सभा झाली. तिथला गर्दीचा उच्चांक बघून आम्हा लोकांची खात्री झाली की यंदा तेलंगणात सत्ताबदल होईल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी नोंदवली.
























































