कारने दिली झाडाला धडक, तरुणाचा मृत्यू

425

शिरूरमधील बोंबळी येथे कारने झाडाला धडक दिल्याने कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बालाजी डिंगाबर भोसले (24) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी भोसले हे अजनी  येथे बहिणीकडे आलेल्या आईला बोंबळीला घेऊन जाण्यासाठी येत होते. त्यावेळी बोंबळीकडून येत असताना जळगावते ते साकोळ दरम्यान भरधाव गाडीवरील ताबा सुटल्यामुळे कार ही मोठ्या झाडावर आदळली. त्यात चारचाकीचा चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या