
दावोसमधील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये राज्य सरकारसोबत सामंजस्य करार झालेल्या तीन कंपन्या अमेरिका, इंग्लंड आणि इस्रायलच्या नसून त्या महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले होते. त्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. दावोस दौऱ्याला दहा दिवस झाले तरी अद्याप त्याबाबतची कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी तीन ट्विट करत घटनाह्य सरकारच्या दौऱ्याबाबतचे तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रगसारखे प्रकल्प इतर राज्यात हलविण्यात आले. त्यावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान 13 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची चौथी बैठक पार पडली. या बैठकीत 70 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. या गुंतवणूकीतून विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागात 55 हजार रोजगार निर्मितीचा दावा सरकारने केला होता, परंतु मंत्रिमंडळ उपसमितीने यासंदर्भातील प्रस्तावांना मंजुरी देऊन जवळपास 45 दिवस उलटून गेले तरीही या 70 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांच्या बैठकीचे इतिवृत्तांत अद्याप मंजूर झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. माय महानगर या वृत्तसंकेतस्थळाने या बाबतचे वृत्त दिले आहे. त्या बातमीचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर टीकस्त्र सोडले आहे.
It’s been almost 10 days from the unconstitutional CM’s single Davos working day.
1) No schedule/ photos of meets of CM
2) No clarification on why repeated announcements to bloat numbers.
3) No clarity on expense details as against real output of Davos.— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2023
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याला जवळपास 10 दिवस झाले आहेत. 1) मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे कोणतेही वेळापत्रक/फोटो नाहीत. 2) नंबर ब्लोट करण्यासाठी वारंवार घोषणा का केल्या जातात. याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नाही. 3) डावोस दौऱ्याच्या खर्चाचा तपशील आणि केलेले करार यातून साध्य काय झालं ? याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.असे पहिले ट्विट त्यांनी केले आहे.
With such an intra- governmental chaos in this unconstitutional government, what signal are we giving to investors?
CMs from other states come here and take away crores of investment.CM from here went to Davos, spent upto ₹40 cr on a 28 hour visit, with no details in public
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2023
”या घटनाबाह्य सरकारमध्ये अशा आंतर-सरकारी अनागोंदी कारभारामुळे आपण गुंतवणूकदारांना नेमके कोणते संकेत देत आहोत? इतर राज्यातील मुख्यमंत्री येथे येतात आणि करोडोंची गुंतवणूक घेऊन जातात आणि इथले मुख्यमंत्री मात्र डाव्होसला जाऊन, आपल्या कामाची कोणतीही अधिकृत माहिती न देता 28 तासांच्या भेटीवर 40 कोटी रुपये खर्च करतात.’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.





























































