माध्यमांवरील धाडी कोणत्या लोकशाहीत बसतात – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही वाटेल ते करू, पण तुम्ही आवाज नाही उठवायचा. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू अशी पाशवी वृत्ती आपल्या देशात पह्फावायला बघते आहे. आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही तर उद्या ती संपूर्ण देश खाऊन टाकेल!

‘लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. न्यायव्यवस्था, प्रशासन, शासन आणि चौथा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमे. ‘बीबीसी’च्या कार्यालयावर धाडी घातल्या गेल्या. माध्यमांवरील धाडी घालणे कोणत्या लोकशाहीत बसते?’, असा खणखणीत सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी सरकारला केला.

शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘बीबीसी’ वृत्तसंस्थेच्या दिल्लीमधील कार्यालयावर आयकर विभागाने घातलेल्या धाडींचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

भारतमाता पुन्हा गुलामगिरीत

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘उत्तर हिंदुस्थानी बांधवांच्या एका कार्यक्रमात मी नुकताच गेलो होतो. त्यावेळी मी म्हटले होते की, त्यावेळची लढाई स्वातंत्र्याची होती. आता हे स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई आहे. स्वातंत्र्य टिकवायचे आहे, कारण गुलामगिरी ही गुलामगिरीच असते. मग ती स्वकीयांची असेल किंवा परकीयांची. वंदे भारत, वंदे मातरम् घोषणा दिल्या जात आहेत. पंतप्रधान उद्घाटने करत आहेत. झेंडे दाखवले जात आहेत. पण दुसरीकडे माझी  भारतमाता पुन्हा गुलाम कशी होईल या दिशेने काहींची पावले जात आहेत. ती वेळीच ओळखून आपल्याला एकत्र आले पाहिजे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

…हे बळ शिवसेनेलाच नव्हे तर महाराष्ट्राला

रियाझ शेख आणि पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तुमची ताकद खूप मोठे बळ देणारी असेल. हे बळ केवळ शिवसेनेलाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला मिळाले आहे. ते बळ आणि एकजूट ही देशाला दिशा दाखवणारी असेल अशी आपण अपेक्षा आणि खात्री व्यक्त करतो.’ याप्रसंगी शिवसेना नेते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मोहन भागवत मशिदीत गेले होते ते काय सोडून आले?

‘रियाज शेख आणि त्यांच्यासोबत सगळे मुस्लिम बांधव-भगिनी आज शिवसेनेत आले. त्यामुळे हिंदुत्व सोडले अशी टीका आपल्यावर पुन्हा होऊ शकते. पण मोहन भागवत काही महिन्यांपूर्वी मशिदीत गेले ते काय सोडून आले? गोमांस खाणाऱ्यांना दरवाजा बंद करता येणार नाही असे आठ-दहा दिवसांपूर्वी दत्तात्रय होसबळे म्हणाले होते, मग त्यांनी काय सोडले?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.