विधान परिषद निवडणूक स्थगितीसाठी शिवसेना न्यायालयात जाणार

विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. मात्र ही निवडणूक बेकायदेशीर, घटनाबाह्य असून तिला स्थगिती दिली पाहिजे यासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. अजित पवार गटाच्या 40 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते आमदार अपात्र ठरू शकतात अशा प्रकारची न्यायालयाची भूमिका असल्याचे न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणावरून स्पष्ट होते. अशा वेळी जे आमदार अपात्र ठरू शकतात त्यांनी मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणणे हे घटनाबाह्य आहे. त्यांना हा अधिकारच नाही, असे संजय राऊत म्हणाले.