
क्रीडा जगतात मानाचे स्थान असलेल्या मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखान्याची चुरशीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांची बिनविरोध तर जनरल सेक्रेटरीपपदी संजीव खानोलकर यांची फेरनिवड करण्यात आली. या निवडणुकीत जिमखान्याच्या 1151 सदस्यांनी मतदान केले. निवडणूक लढवणाऱ्या प्रवीण अमरे-अनिरुद्ध जोशी आणि संजीव खानोलकर-दीपक मुरकर पॅनेल्सना निवडणुकीत संमिश्र यश लाभले. निवडणूक अधिकारी म्हणून मोहन खटावकर यांनी काम पाहिले.
माजी कसोटीपटू आणि विद्यमान अध्यक्ष प्रवीण अमरे यांचा नावलौकिक पाहता त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी पॅनेलने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे अमरे यांची एकमताने अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाली आहे. विद्यमान जनरल सेव्रेटरी संजीव खानोलकर यांनी या निवडणुकीत 581 मते मिळवत आपला विजय साकारला. त्यांचे प्रतिस्पर्धी अनिरुद्ध जोशी यांना 550 मते मिळाली. सहाय्यक जनरल सेक्रेटरीपदीही सुनील रामचंद्रन (रमणी) यांची 654 अशा मोठय़ा मताधिक्याने फेरनिवड झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी योगेश पोवार यांना 467 मते मिळाली.
जिमखान्याचे निवडून आलेले पदाधिकारी
अध्यक्ष ः प्रवीण अमरे, विश्वस्त ः लता देसाई, मिलिंद सबनीस, प्रकाश नायक; जनरल सेक्रेटरी ः संजीव खानोलकर, सहाय्यक जनरल सेक्रेटरी ः सुनील रामचंद्रन; उपाध्यक्ष ः समीर पेठे, विक्रम पटवर्धन, विलास साळुंके; कार्याध्यक्ष ः दीपक मुरकर, सहकार्याध्यक्ष ः विश्वास नेरुरकर; खजिनदार ः विलास सोमण; टेनिस सेक्रेटरी ः योगेश परुळेकर, टेनिस सदस्य ः चंद्रकांत राऊत (बिनविरोध); क्रिकेट सेक्रेटरी ः सुशांत मांजरेकर, क्रिकेट सदस्य ः सिद्धेश किनळेकर; कार्ड सेक्रेटरी ः अजय पाटणकर, बिलियर्ड सेक्रेटरी ः शेखर सुर्वे; इनडोअर खेळ सेक्रेटरी ः विजय अल्वा, पॅन्टीन सेक्रेटरी ः आशुतोष जोगळेकर; कमिटी सदस्य ः समीर भोबे, अॅड. संकेत बापट.
























































