आर्थिक संकटातील अभिनेते मनमोहन माहीमकर यांना शिवसेनेचा आधार

गोलमाल, जत्रा, नाना-मामा, यंदा कर्तव्य आहे यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसह अनेक नाटकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या मनमोहन माहीमकर यांच्या आर्थिक संकटात शिवसेना मदतीला धावून गेली आहे. शिवसेना नगरसेवक आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी याबाबत माहिती मिळताच तातडीने माहीमकर यांच्या घरी जाऊन आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या. आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अनिल कोकीळ यांनी माहीमकर यांच्या गिरगाव येथील घरी जाऊन आस्थेने विचारपूस केली. शिवसेना तुमच्या पाठीशी असून आगामी काळातही शिवसेना मदत करेल असे आश्वासनही कोकीळ यांनी माहीमकर यांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या