200 दुष्काळग्रस्त कुटुंबांना शिवसेनेचा आस्थेचा घास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, हिंगोली

मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाची वक्रदृष्टी हिंगोली जिल्ह्यावर कायम असुन सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळले आहे. यावर्षीही जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासह निराधार व गोरगरिबांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणाऱ्या मदतीच्या भरवशावर न राहता शिवसेना आत्महत्याग्रस्त शेतकरी व निराधारांच्या कुटूंबीयासाठी मदतीला धावून आली आहे. शिवसेनेचे हिंगोली विधानसभा संपर्कप्रमुख आशीष गुलवाडे यांच्या आस्था चॅरिटेबल ट्रस्टकडून जिल्ह्यातील सेनगाव व हिंगोली तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 200 कुटुंबीयांना नर्सी नामदेव येथे प्रत्येकी किलो याप्रमाणे तब्बल 6 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

मराठवाड्यासह विदर्भात मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख आशीष गुलवाडे यांच्या आस्था चॅरिटेबल ट्रस्टकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसह निराधारांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळत नसून शेतकरी, मजूर, निराधार यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न भेडसावत आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, कळमनुरी या तालुक्यात देखील हीच परिस्थिती असून खरीप व रब्बी हंगामाचे पीक हातचे गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक गाव, वाडी-तांड्यावरील शेतकरी व मजुरांनी कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर करत आहेत. विशेष म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकरी, अपंग व निराधारांपुढे पोट भरण्याचा प्रश्न उभा टाकला आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची वाट न पाहता शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख आशीष गुलवाडे यांच्या आस्था चॅरिटेबल ट्रस्टकडुन जिल्ह्यातील सेनगाव व हिंगोली तालुक्यातील दुष्काळात होरपळणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी व निराधार 200 कुटुंबांना 31 मे रोजी श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथे तब्बल 6 टन अन्नधान्य वाटप करण्यात आले. गोरगरीब कुटुंबाची उपासमारी होऊ नये यासाठी प्रत्येकी गहु आटा 10 किलो, 5 किलो तांदुळ, 5 डाळ, 5 किलो तेल आदी संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्याचे आस्था चॅरिटेबल ट्रस्टकडून वाटप करण्यात आले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीपुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न उभा टाकलेला असतांना या दुष्काळी परिस्थितीत हाताला कामही मिळत नसल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यामुळे ’दुष्काळ गंभीर तर शिवसेना खंबीर’ असे शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख आशीष गुलवाडे यांच्या आस्था चॅरिटेबल ट्रस्टने दाखवून देत गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगितले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी व निराधार, गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याचेही यावेळी शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख आशीष गुलवाडे यांनी सांगितले. या कार्यक्रमास लोकसभा संकर्पमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, मुंबई येथील डॉ. मनोहर पंडीत, कृऊबा समितीचे माजी सभापती रामेश्वर शिंदे, लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, माजी खासदार शिवाजी जाधव, भानुदास जाधव, कडुजी भंवर, संतोष देवकर, माजी जि.प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, संतनु अजमिरे, राहुल बोजा, सागर खेडकर, सुदर्शन खोपे, रुपेश फाटे, शाहुराव देशमुख, कृष्णा बांगर, नामदेव काकडे यांच्यासह शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिक व परिसरातील गावामधुन आलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, माळहिवरा येथील दिव्यांग असलेले रत्नाकर जाधव यांच्या दोन मुलीच्या लग्नाचा खर्चही आस्था चॅरिटेबल ट्रस्ट उचलणार असल्याचे यावेळी आशीष गुलवाडे यांनी सांगितले.