हिंमत असेल तर निलेश राणेंनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावीच! वैभव नाईक यांचे खुले आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आता ताकद संपलेली आहे. तरीही त्यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे आपल्या प्रत्येक भाषणात याला लोळवू, त्याला लोळवू अशी भाषा करत आहेत, हे योग्य नाही. निलेश राणेंमध्ये एवढीच हिंमत असेल तर त्यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात माझ्या विरोधात रिंगणात उतरून दाखवावेच, मग बघूया कोण कुणाला लोळवतं आणि जनता कुणाला धुळ चारतेय, असे खुले आव्हान शिवसेनेचे निष्ठावंत आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिले आहे. नारायण राणे यांना एकदा आपण हरविले आहे, आता त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांनाही पराभवाची धूळ चारणार असून त्यांचा पराभव अटळ आहे, असे वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी कुडाळ शिवसेना शाखेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. जान्हवी सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर, युवासेनेचे सुशिल चिंदरकर, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, मिलिंद नाईक, राजू गवंडे, अमित राणे, बाबी गुरव, गोट्या चव्हाण, भारती मठकर, स्वप्नील शिंदे, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.