पैसे उधार ठेवून कपडे न दिल्यामुळे टोळक्याची दुकानदाराला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उधारीवर कपडे न दिल्याच्या रागातून टोळक्याने कापड दुकानदाराला दांडक्याने मारहाण केल्याची घटना औंधमधील रिबॉन शॉपमध्ये घडली. याप्रकरणी मिथुन जुन्नरकर (वय 32, रा. पिंपळे निलख) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

औंधमधील परिहार चौकात मिथुन यांचे कपड्याचे दुकान आहे. 7 सप्टेंबरला पाचजण त्यांच्या दुकानात कपडे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दुकानदाराला कपड्याचे पैसे नंतर देतो असे सांगत उधार मागितली. मात्र मिथुनने त्यांना नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने त्यांना दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मोहनदास जाधव तपास करीत आहेत.