
श्रद्धा वालकर हिच्या हत्याकांडात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलीस तपासात आफताब त्याच्या व श्रद्धाच्या नात्यात त्याने गाठलेल्या क्रूरतेबद्दल सांगत आहे. नुकताच श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमा असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो 2020 चा असून त्यावेळी आफताबने श्रद्धाला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे श्रद्धाला तीन दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले होते.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आफताबने त्याची पार्टनर श्रद्धा हिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. सुरुवातीला तिची गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. तिच्या चेहऱ्याची ओळख पटू नये म्हणून त्याने तिचा चेहरा जाळला. तिच्या शरीराचे तुकडे त्याने फ्रिजमध्ये भरून ठेवले होते व दररोज रात्री तो एक एक तुकडा जंगलात नेऊन फेकत होता.
हत्येवेळी गरोदर होती श्रद्धा वालकर?
मृत्युवेळी श्रद्धा गरोदर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंगळवारी पोलिसांना एक माकडहाडाचा मोठा भाग सापडला आहे. हा भाग श्रद्धाच्या मृतदेहाचा असावा, असा अंदाज असून त्याची तपासणी केली जात आहे. दिल्ली पोलिसांना श्रद्धा तिच्या हत्येवेळी गर्भवती असल्याचा संशय आहे. इतक्या वेळानंतर सापडलेल्या हाडांच्या मदतीने तिची गर्भधारणा निश्चित करणं कठीण आहे. घरी किंवा तिच्या मोबाईलवर सापडलेल्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवरूनच याची माहिती कळू शकेल की ती खरोखर गर्भवती होती किंवा नाही.
फ्रीजमध्ये श्रद्धाचा मृतदेह अन् त्याच फ्लॅटमध्ये आफताबचा रोमान्स

























































