
टिव्ही अभिनेत्री श्रेनू पारिखच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. ती अभिनेता अक्षय म्हात्रे याच्यासोबत विवाहबंधनवात अडकणार आहे. श्रेनूने तिच्या मेहेंदीते फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. श्रेनूने मेहंदी फंक्शनसाठी इंडो वेस्टर्न पिस्ता ग्रीन रंगाचा लेहेंगा घातला आहे. त्यात ती फार सुंदर दिसत आहे. तिने केसांना सॉफ्ट कर्ल करुन केस मोकळे सोडले आहे. तसेच केसांमध्ये तियारा घातला आहे, श्रेनूने तिच्या लेहेंग्याशी मिळते जुळती फ्लोरल ज्वेलरी घातली आहे. तर चेहऱ्यावर श्रेनुने हलका मेकअप केला होता जो तिच्या आऊटफिटसोबत परफेक्ट दिसत होता. तिने हातांना मेहेंदी लावली असून ती फ्लॉन्ट करताना दिसत आहे. श्रेनू आणि अक्षय दोघं 21 डिसेंबर रोजी विवाह बंधनात अ़डकणार आहेत.































































