
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री किआरा आडवाणी हे लग्नबंधनात अडकले आहेत. सिद्धार्थ व किआरा यांचा सूर्यगढ पॅलेसमध्ये पंजाबी पारंपारिक पद्धतीत राजेशाही विवाहसोहळा पार पडला. सिद्धार्थने सफेद घोड्यावरून अगदी धमाकेदार पद्धतीत एन्ट्री केली. त्याच्या एन्ट्रीला ‘साजन जी घर आए’ हे गाणं लावलेलं होतं.
सिद्धार्थ किआराच्या लग्नासाठी शनिवारपासूनच सूर्यगढ पॅलेसवर बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी पाहायला मिळाली. जुही चावला, अरमान मलिक, करण जोहर, शाहीद कपूर, मीरा राजपूत, इशा अंबानी, मलायका अरोरा हे सूर्यगढ पॅलेसवर लग्नासाठी पोहोचले होते.