
सामना ऑनलाईन । कानपूर
कानपूरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलवर पॉर्न पाहून अल्पवयीनांनी ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. हे सर्व आरोपी सहा ते दहा वर्ष वयोगटातील आहेत. पोलिसांनी चारही मुलांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
कानपूरमधील महाराजपूर भागामध्ये गेल्या शनिवारी (३० जून) चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी २ जुलै (सोमवारी) रोजी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या वडिलांनी तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार, पीडिता बेशुद्ध अवस्थेमध्ये एका शेतात सापडली. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत झालेला प्रसंग सांगितला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणातील एक आरोपी हा १२ वर्षाचा असून इतर तिघे सहा ते १० वर्षांचे आहेत असे महाराजपूर पोलीस स्थानकाचे प्रमुख राकेश मौर्य यांनी सांगितले. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चारही मुलांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने या सर्वांना बालसुधार गृहामध्ये पाठवले आहे. सर्व मुलांनी आपल्यावरील आरोप कबुल केल्याची माहिती मिळत आहे.
Kanpur: 4-yr-old girl allegedly gang raped by children aged b/w 6 to 10 yrs of age in Maharajpur police station area on 30 June. Police say ‘Case under POCSO Act registered, children detained. They had probably watched pornographic content on their phone. It’s being investigated’ pic.twitter.com/70ZVAe2pIg
— ANI UP (@ANINewsUP) July 3, 2018
पॉर्न पाहून केला बलात्कार
आरोपी मुलांनी पीडितेवर बलात्कार करण्यापूर्वी मोबाईलमध्ये पॉर्न पाहिला होता. पॉर्नमध्ये जसे दाखवले जात होते तसेच आरोपींनी पीडितेसोबत करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती राकेश मौर्य यांनी दिली आहे.




























































