काँग्रेस पाठोपाठ सपाची पहिली यादी जाहीर, मुलायम यादवसह तीन विद्यामान खासदारांना तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव व अखिलेश यादव या दोघांनीही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. मध्यंतरी पक्षाच्या अध्यक्षपदावरून बापलेकामध्ये मतभेद देखील झाले होते.

सामना ऑनलाईन । लखनौ

काँग्रेस पाठोपाठ समाजवादी पक्षानेही आपली लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत सहा उमेदवारांनी नावे असून त्यात मुलायम सिंह यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. मुलायम सिंह यादव मैनपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवतील. मुलायम सिंह सध्या आझमगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून 2014 साली ते दोन्ही जागेवरून निवडणूक जिंकली होती. नंतर त्यांनी मैनपुरीतून राजीनामा दिला होता.

अलावा बदायुंमधून धर्मंद्र यादव आणि फिरोजबादाहून अक्षय यादव हे निवडणूक लढवतील. दोघांनी 2014 च्या मोदी लाटेत विजयश्री खेचून आणली होती. आगामी लोकसभेत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती झाली आहे. जागावाटपानंतर अखिलेश यांनी आपली यादी जाहीर केली असली तरी मायावतींनी अजून आपली यादी जाहीर केलेली नाहे.