दुर्मिळ मांडूळांची तस्करी करणाऱ्याला अटक

आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असणाऱ्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन जिंवत मांडूळ जप्त करण्यात आले आहेत. विकास रामचंद्र फडतरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात एकजण मांडूळांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी शंकर कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विकास फडतरे याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये दोन जिवंत मांडूळ प्रजातीचे साप आढळले. पोलिसांनी विकासला अटक केली आहे. त्याने मांडूळ कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते, याची चौकशी पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या