…म्हणून सेरेना रडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

आपल्या मुलाने अथवा मुलीने जन्माला आल्यानंतर काही महिन्यांनी टाकलेले पहिले पाऊल म्हणजेच सानपाऊल पहायला प्रत्येक आई आतुर असते. मग टेनिसतारका सेरेना त्याला अपवाद कशी असणार. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेरेनाने एका गोड कन्येला जन्म दिला. ऑलीम्पिया असे तिच्या या कन्येचे नाव आहे.ऑलीम्पिया चालायला लागणार ती वेळ आता आलीय. पण नेमके याच वेळेस सेरेनाला आपले आठवे विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी लंडनमध्ये यावे लागले.ऑलीम्पियाने सानपाऊल टाकले तो क्षण पहायला सेरेना घरी नव्हती . कारण तिला विम्बल्डनच्या पूर्वतयारीसाठी घरापासून दूर राहावे लागले होते. त्या गोड क्षणी मी घरी नव्हते या आठवणीने मला धाय मोकलून रडू कोसळले , असे ट्विट सात वेळा विम्बल्डन महिला एकेरी जेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाने आपल्या ट्विटर हँडलवर टाकले आहे.

अमेरिकन टेनिसतारका सेरेना विलियम्सने यंदाच्या विम्बल्डनमध्ये क्रिस्टिना मडिनोविकला पराभूत करीत महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. त्यानंतर तासाभरातच सेरेनाने आपल्या कन्येच्या सानपाऊल टाकण्याचा प्रसंग सोशिअल मीडियावर टाकत शेअर केला. तिला कुणीतरी विचारले कि, तुझ्या लहानग्या कन्येला तू असे सोशिअल का केलेस.या स्पर्धेत कुठल्याही महिला टेनिसपटूंने आपल्या कुटुंबाचा उल्लेखही केलेला नाही. त्यावर सेरेना म्हणाली कि , मी आधुनिक विचाराची आहे.मुलीची गोड आठवण शेअर करण्यात मला काहीच गैर वाटत नाही. आपल्या २४ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाकडे कूच करणाऱ्या सेरेनाला विम्बल्डन उपउपांत्यपूर्वफेरीत रशियन क्वालिफायर येवगेनीया रोडिनाशी झुंजावे लागणार आहे.