
‘कांटा लगा’ गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवाला सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ जबरदस्त वायरल होत आहे. व्हिडीओत नवऱ्यासोबत क्रुझवर टायटॅनिकची पोज देताना वारा आल्याने तिला उप्स मूमेण्टचा शिकार व्हावे लागले आहे, असे व्हिडीओत दिसत आहे. या घटनेनंतरही तिने स्वत:ला सावरले.
शेफाली जरीवाला काही दिवसांपूर्वी पती पराग त्यागीसोबत सुट्टीत मालदीवला गेली होते. तिथून तिने अनेक फोटो, व्हिडीओज शेअर करत होती. दरम्यान तिने ए व्हिडीओ शेअर केला आणि तो खूप वायरल झाला. शेफाली या व्हिडीओत क्रुझवर पराग त्यागीसोबत टायटॅनिकची पोझ देत होती. त्यावेळी जोरदार वारा आला. यावेळी तिने लेस स्टाईल पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता, जो हवेबरोबर उडायला लागला आणि ती उप्स मूमेण्टचा शिकार झाली. मात्र तिने या घटनेनंतरही तिने स्वतःला सहजतेने सावरले आणि फोटोशूट केले.
उप्स मूमेण्टनंतर शेफाली सहजतेने पोज देत गेली. आता दोन दिवसांपूर्वी शेफालीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिला या व्हिडीओने फरक पडला नाही, तरी नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. काही यूजर्सने हवा मे उडता जाये, कोणी हमे सब दिख गया अशाप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

























































