सोलापूर ड्रग्ज प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-9 च्या पथकाने सोलापूर येथे धडक कारवाई करत एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. अगदी छुप्या पद्धतीने एमडी ड्रग्ज बनविणाऱया दोघा भावांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी शेकडो कोटी किमतीचे एमडी जप्त केले होते. या प्रकरणात कैलास वनमाळी (50) या तिसऱया आरोपीला दया नायक व त्यांच्या पथकाने बेडय़ा ठोकल्या आहेत.