
सोलापूर जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाण्यात रुई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीकेच्या घरी 16 व 17 नोव्हेंबर रोजी चोरी झाल्याची घटना घडली होती. यामधील आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले असून चोरीचा तपास करण्यासाठी गुरुवारी गंगाखेड येथील सराफा व्यापाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
गंगाखेड शहरातील भगवती चौकातील सराफा दुकानदार रवींद्र डानशिव याला गुरुवार सोने-चांदी खरेदी केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान चोरीचा माल हस्तगत केला. सोलापूर जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाण्यात रुई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारीका म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा विजय विष्णू या दिवाळीसाठी आपल्या माहेरी बार्शी येथे गेल्या होत्या. 16 व 17 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी चोरी झाली. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, एल.इ.डी. संगणक पीसीवो, डिजिटल ग्लुकोमीटर असा ऐवज लंपास केला होता. ज्याची किंमत दीड लाख रुपये आहे.
































































